
घटना
रविवारच्या सुट्टीच्या दिवशी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान प्रचंड गर्दीमुळे इंद्रायणी नदीवरचा जुना कोसळला.
घटनेच्या वेळी जवळजवळ १५० लोक उपस्थीत होते. पर्यटक आणि स्थानीक यांच्या रेट्यामुळे हा पूल खचला.
जीवितहानी
घटनास्थळीच दोघांचा मृत्यू तर दोघांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.
जखमी
सुमारे ४० जण जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यापैकी ६ जण अत्यवस्थ असल्याचे समजते.
शासकीय यंत्रणांकडून अजूनही बचावकार्य चालू,
क्रेनच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम चालू आहे , १० ते १५ जण अजूनही अडकल्याची भीती असून मदतकार्य अव्याहतपणे चालू आहे. NDRF ची तुकडी , स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने जलद गतीने मदत कार्याचे नियोजन करीत आहेत.
दुर्घटनेचे कारण
सुरुवातीच्या काळात म्हणजे जवळ जवळ तीस एक वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन हा पूल बांधला होता, मात्र यथावकाश या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढून ते वाहनासह या ठिकाणी यावयास लागले. परिणामी अतिरिक्त वजन ,पुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष, त्यामुळे गंज लागणे अशा गोष्टींमुळे सदर पुलाची क्षमता कमी होऊन तो आज कोसळला असे तरी प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे.
शासकीय निर्देश ;
या इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुर्घटनेमुळे राज्य सरकारने सर्व जुन्या पुलांचे बांधकाम लेखा परीक्षण करुन आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
भरपाई आणि मदत
मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली, तर जखमींच्या वैद्यकीय खर्चाचाही राज्य सरकार करणार आहे. या घटने बाबत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनीही मुख्यमंत्र्यांना फोन करुन शोक व्यक्त केला आहे.
pune bridge collapse
pune bridge collapses
pune
indrayani river
pune news
pune bridge
bridge collapse pune
indrayani bridge pune
indrayani river bridge collapse
bridge collapse
pune news today
kundmala news today
bridge collapse in pune
indrayani river pune
pune bridge collapse indrayani river